Thursday, 26 October 2017

पिंट्याची लव्ह स्टोरी' नवीन मराठी चित्रपट

'पिंट्याची लव्ह स्टोरी' हा नवीन मराठी चित्रपट आहे ज्यात नवोदितांना संधी देण्यात आली आहे. नोटबंदी आणि आता GST यामुळे निर्मात्यांमध्ये जिथे निराशेचे वातावरण आहे, अशात 'रेड शिवाय फिल्म्स' आणि राज सिंग यांनी नवोदितांना संधी देत या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 


चित्रपटाचे दिग्दर्शक राज सिंग म्हणाले, "माझ्याकडून हा चित्रपट म्हणजे माझी जन्मभूमी आणि महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांना मानवंदना आहे. मराठी आणि मराठी चित्रपटांवर मी माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत प्रेम करत राहीन.आणि नवोदितांना संधी देण्याबद्दल म्हणाल तर, मी यापुढेही त्यांना संधी देण्याचा प्रयत्न नक्की करेन कारण मीसुद्धा कधीतरी नवीन होतो.आम्ही आणखीनही चित्रपट घेऊन येणार आहोत यासाठी मेहनती आणि आपले भविष्य या क्षेत्रात घडवू पाहणाऱ्या नवोदितांसाठी आमची दारे नेहमी खुली असतील."

भारतातील सर्वात पहिली फिल्म इंडस्ट्री म्हणजे  मराठी फिल्म इंडस्ट्री. "राजा हरिश्चंद्र " हा मुखपट तयार करून दादासाहेब फाळके यांनी या चित्रपट सृष्टी चा पाया रचला. त्यानंतर अनेक चित्रपट आले. पण मराठी चित्रपटांची मजाच काही वेगळी.
   चित्रपटाचे 2nd लीड एक्टर शिशिर पाटिल  म्हणाले  , " लहान असताना खूप वाटायचे आपण पण सिनेमात जावे. अभिनयाची आवड खूप होती, पण गावी कधी जमलेच नाही. जसा कॉलेजमध्ये गेलो तेव्हा मात्र एकांकिका आणि नाटक ह्या मध्ये आपले अभिनय कौशल्य दाखण्याची संधी मिळाली. नंतर मुबंई मध्ये नोकरी करू लागलो. तेव्हा कलर्स मराठी वरील "गणपती बाप्पा मोरया " ह्या सिरीयल मध्ये काम करण्याची संधी मिळाली. मला व्यायाम करण्याची खूप आवड. कंपनीच्या कामाचा ताण दूर ठेवून मी रोज जिमला जायचो आणि त्या मेहनतीचे व अभिभिनयाचे फळ असेल.  " पिंट्याची लव्ह स्टोरी " ह्या आपल्या चित्रपटासाठी त्यानां जसे हवे होते त्या भूमिकेसाठी माझी निवड झाली. मुख्य भुमिकेत असणारा हा माझा पहिलाच चित्रपट. 
             चित्रपटात जे कलाकार आहेत ते सर्व नोकरी करत करत चित्रपटासाठी वेळ देत होते. ह्या आमच्या टिम ला समजून घेतल्याबद्दल मी आमच्या चित्रपटाचे दिग्दर्शक  राज सिंग सरांचा खूप आभारी आहे. 
              हिंदी इंडस्ट्री मध्ये असून सुध्दा राज सरांची मराठी चित्रपटांबद्दल खूप ओढ, त्याच्यासोबत काम करताना ते मराठी नाहीत असे कधीच वाटले नाही. ही आहे मराठी चित्रपटांची जादु.           

              तुम्हा माय-बाप प्रेक्षकांचे आशिर्वाद सदैव आमच्या सोबत असो... शिशिर पाटिल

  1. http://<iframe style="width:120px;height:240px;" marginwidth="0" marginheight="0" scrolling="no" frameborder="0" src="//ws-in.amazon-adsystem.com/widgets/q?ServiceVersion=20070822&OneJS=1&Operation=GetAdHtml&MarketPlace=IN&source=ac&ref=tf_til&ad_type=product_link&tracking_id=myfilmtvtalks-21&marketplace=amazon&region=IN&placement=B071HWTHPH&asins=B071HWTHPH&linkId=941d23e3447c1ea2195d4f2d91e7e4a7&show_border=false&link_opens_in_new_window=false&price_color=333333&title_color=0066C0&bg_color=FFFFFF"> </iframe><a target="_blank" href="https://www.amazon.in/b?_encoding=UTF8&tag=myfilmtvtalks-21&linkCode=ur2&linkId=59eb9d934ac85073b89eaf22236cca55&camp=3638&creative=24630&node=5925789031">http://www.myfilmtvtalks.blogspot.com/</a><img src="//ir-in.amazon-adsystem.com/e/ir?t=myfilmtvtalks-21&l=ur2&o=31" width="1" height="1" border="0" alt="" style="border:none !important; margin:0px !important;" />

No comments:

Post a Comment

Raj singh suryavanshi bags a comedy series

  Talented actor Raj Singhh Suryavanshi has explored different genres when it comes to acting. After exploring the Mythological genre with s...